अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील मुक्काम गुहा (पोस्ट गणेगाव) हे गाव अत्यंत सक्रिय व प्रगतिशील म्हणून ओळखले जाते.
या गावामध्ये पायाभूत सुविधा तसेच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, महिला सशक्तीकरण, जलसंधारण, वृक्षारोपण आणि कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात.
ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक आणि विविध संस्थांच्या सहकार्यामुळे गावात सातत्याने नाविन्यपूर्ण व विकासाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मुक्काम गुहा गावाने अल्पावधीत एक आदर्श व विकासशील गाव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गावामध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची काही झलक खाली दिली आहे…